पाश्चात्य
वैद्यकशास्त्रात, Kt/V ही मितीहीन गुणोत्तर संख्या, रक्तातील यांत्रिक
मल-निस्सारण-उपचारांचा पूर्तीस्तर दर्शवत असते. यातः
K - यांत्रिक मल-निस्सारणाची युरिया-स्वच्छता-क्षमता, लीटर/तास
t - यांत्रिक मल-निस्सारण कालावधी, तास
V – युरियाचे वितरण क्षेत्र, अदमासे रुग्णाच्या शरीरातील एकूण शारीर पाणी, लीटर
जेव्हा हे गुणोत्तर १ असते तेव्हा, यांत्रिक
मल-निस्सारणा-दरम्यान, एकूण शारीर युरियाचे सर्व वितरण
क्षेत्र, एकदा युरिया-विहीन झालेले असते.
फ्रँक गॉच आणि जॉन सार्जंट
ह्यांनी, नॅशनल को-ऑपरेटिव्ह डायलिसिस स्टडीमधील विद्याचे (माहितीचे) विश्लेषण करत
असता, यांत्रिक मल-निस्सारणाच्या पूर्ततेचा स्तर निर्धारित करण्यासाठी, ही
गुणोत्तराची संकल्पना विकसित केली. यू.एस. नॅशनल किडनी फौंडेशन मध्ये Kt/V ≥ १.३ राखण्याचे लक्ष्य ठरवले जाते,
ज्यामुळे किमान १.३ इतके तरी यांत्रिक मल-निस्सारण
प्रत्यक्षात प्राप्त होण्याची खात्री बाळगता येते.
आता असे गृहित धरूया की, यांत्रिक मलनिस्सारणानंतर (पोस्ट-डायलिसिस) आणि यांत्रिक मलनिस्सारणापूर्वीच्या (प्रि-डायलिसिस) रक्तद्रावणातील
युरियामधील नत्राच्या संहती, अनुक्रमे C मोल/लीटर आणि C० मोल/लीटर आहेत.
जेव्हा शरीरातील एखाद्या पदार्थाची
संहती, त्या पदार्थाच्या वर्तमान संहतीच्या प्रमाणात घटत असते तेव्हा, अशा
प्रकारचा र्हास घातधर्मी म्हणवला जातो. अशा घातधर्मी र्हासात, शरीरातील त्या
पदार्थाच्या र्हासाचा दर शरीरातील त्या पदार्थाच्या वर्तमान संहतीच्या प्रमाणात
असतो. हेच गणितीय परिभाषेत आपल्याला खालीलप्रमाणे लिहिता येईल.
V(dC/dt) = - KC ...... (१) यात,
C म्हणजे मोल/लीटर एककांत व्यक्त केलेली शरीरातील त्या पदार्थाची वर्तमान
संहती,
t म्हणजे तास ह्या एककात व्यक्त केलेला यांत्रिक मलनिस्सारणाचा कालावधी,
K म्हणजे घन मीटर/तास एककांत व्यक्त केलेली यांत्रिक मल-निस्सारणाची युरिया-स्वच्छता-क्षमता,
V म्हणजे लीटर ह्या एककात व्यक्त केलेले शरीरातील
युरिया-वितरण-क्षेत्राचे आकारमान होय.
समीकरण (१) ची गणितीय उकल
C = Co e** (-Kt/V)
किंवा
Kt/V = ln (Co/C) ...... (२)
अशी करता येते. ह्यात अनुक्रमे C मोल/लीटर आणि C० मोल/लीटर ह्या,
यांत्रिक मलनिस्सारणानंतर (पोस्ट-डायलिसिस) आणि यांत्रिक मलनिस्सारणापूर्वीच्या
(प्रि-डायलिसिस) रक्तद्रावणातील युरियामधील नत्राच्या संहतींचे प्रत्यक्ष मापन
करता येते. म्हणून यांत्रिक-मलनिस्सारण-आपूर्ती (Kt/V) सुद्धा अप्रत्यक्षरीत्या मोजली जाऊ
शकते.
ह्यावरून, युरिया-रिडक्शन-रेशो URR = १- C / C०
आकडेमोडीचे उदाहरण
तर Kt/V = (१२.९ x ४) / (७० किलोग्रॅम x ०.६ लीटर पाणी/ किलोग्रॅम शरीर-वस्तुमान) = १.२३
याचा अर्थ असा होतो की जर
रुग्णास Kt/V = १.२३ होईपर्यंत
यांत्रिक-मलनिस्सारण पुरवले, आणि रक्तातील
युरिया-नत्राची (मलनिस्सारणा नंतरची पातळी/मलनिस्सारणापूर्वीची पातळी), हे
गुणोत्तरही १.२३ हेच असायला हवे.
संदर्भ
२.
http://kidney.niddk.nih.gov/kudiseases/pubs/hemodialysisdose/#kt/v
नॅशनल किडनी अँड युरोलॉजिक डिसिजेस इन्फॉर्मेशन क्लिअरिंग हाऊस, यू.एस.डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेस ह्यांचे अधिकृत संकेतस्थळ.
नॅशनल किडनी अँड युरोलॉजिक डिसिजेस इन्फॉर्मेशन क्लिअरिंग हाऊस, यू.एस.डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड ह्युमन सर्व्हिसेस ह्यांचे अधिकृत संकेतस्थळ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा