निर्जलमांस (क्रिएटिनीन) म्हणजे काय?
निर्जलमांस (क्रिएटिनीन) हा एक टाकाऊ रेणू आहे जो स्नायुंच्या चयापयातून निर्माण होत असतो. स्नायूंतील ऊर्जानिर्मितीस खूप महत्त्वाच्या असलेल्या मांस (क्रिएटीन) रेणूंपासून तो निर्माण होत असतो. शरीरातील सुमारे २% मांस हे दर दिवशी निर्जलमांसात परिवर्तित होत असते. रक्तप्रवाहातून ते मूत्रपिंडांत वाहून नेले जाते. मूत्रपिंडे त्यापैकी बव्हंशी निर्जलमांस गाळून वेगळे करून मूत्रावाटे विसर्जित करत असतात.
शरीरातील स्नायूंचे वस्तुमान दैनंदिन स्तरावर काही बदलत नसते. म्हणूनच, दैनंदिन स्तरावर निर्जलमांसाची निर्मितीही प्रामुख्याने स्थिरपदच राहत असते.
रक्तातील निर्जलमांसाची पातळी माहीत करून घेणे, का महत्त्वाचे ठरत असते?
मूत्रपिंडे रक्तातील निर्जलमांस सामान्य पल्ल्यात राखत असतात. निर्जलमांस, मूत्रपिंडांच्या कार्याचे एक चांगले निदर्शक असल्याचे आढळून आलेले आहे. वर्धित निर्जलमांस पातळ्या मूत्रपिंडांत बिघाड झाल्याच्या किंवा मूत्रपिंड विकार झाल्याच्या द्योतक असतात.
कुठल्याही कारणाने जर मूत्रपिंडे बाधित झाली तर, मूत्रपिंडांद्वारे त्याचे अपुरे निष्कासन झाल्यामुळे, रक्तातील निर्जलमांस पातळ्या वाढू लागतात. अपसामान्यपणे उच्च झालेल्या निर्जलमांस पातळ्या मूत्रपिंडांतील संभाव्य बिघाडाची किंवा मूत्रपिंडे निकामी झाल्याचा सूचक इशारा असतात. याकरताच, नियमितपणे केलेल्या रक्ताच्या प्रमाणित चाचण्या रक्तातील निर्जलमांसाची नोंद ठेवतात.
शरीरातून मूत्रपिंडांद्वारे किती निर्जलमांस निष्कासित केले जाते यावरून, मूत्रपिंडकार्याचे अधिक नेमके मापन केले जाऊ शकते. ह्यालाच ’निर्जलमांस निष्कासन’ म्हटले जाते आणि मूत्रपिंडांच्या गाळप-दरावरून (ग्लॉमेरुलर फिल्टरेशन रेट, जी.एफ.आर.) ह्याचा अंदाज काढला जातो. निर्जलमांस निष्कासन दोन प्रकारे मोजले जाऊ शकते. रक्तद्रावणातील निर्जलमांस पातळ्या, रुग्णाचे वजन आणि वय यांतील सूत्राद्वारे आकडेमोडीने शोधून काढले जाऊ शकते. याशिवाय, २४ तासांतील मूत्र-नमुने गोळा करून त्यावरून अधिक थेटपणेही काढले जाऊ शकते.
रक्तातील-युरिया-नत्र (ब्लड-युरिया-नायट्रोजन, बी.यू.एन.) पातळीही, मूत्रपिंडकार्याचे आणखी एक निदर्शक असते. युरिया[१] हेही चयापचयातील एक टाकाऊ द्रव्य असते, जे शरीरात, मूत्रपिंडकार्यात बिघाड झाला असता वाढत जाऊ शकते. रक्तातील-युरिया-नत्र आणि निर्जलमांस यांचे गुणोत्तर सामान्यतः, मूत्रपिंडकार्याबाबतची अधिक नेमकी माहिती देते. केवळ निर्जलमांस पातळीचे तुलनेत, संभाव्य अनुस्यूत कारणेही देते. शरीराच्या निर्जलीकरणासोबतच रक्तातील-युरिया-नत्रही वाढत असते.
सामान्यतः रक्त-निर्जलमांस-पातळ्या कोणत्या असतात?
प्रौढ पुरूषांत सामान्य रक्त-निर्जलमांस-पातळ्या सुमारे ०.६ ते १.२ मिलीग्रॅम/डेसीलिटर, तर प्रौढ स्त्रियांत सामान्य रक्त-निर्जलमांस-पातळ्या सुमारे ०.५ ते १.१ मिलीग्रॅम/डेसीलिटर इतक्या असतात. (मेट्रिक प्रणालीत एक मिलीग्रॅम म्हणजे एका ग्रॅमच्या हजाराव्या हिस्स्याइतके वजन असते, तर एक डेसीलिटर हे एका लिटरचा दहावा हिस्सा इतके आकारमान असते.)
सामान्य लोकांपेक्षा बळकट तरूण अथवा मध्यमवयीन प्रौढांत रक्तातील निर्जलमांस पातळ्या अधिक असू शकतात. दुसर्या बाजूस वयस्क व्यक्तींत रक्तातील निर्जलमांस पातळ्या सामान्य लोकांपेक्षा कमीही असू शकतात. बालकांत, सामान्य निर्जलमांस पातळ्या, त्यांच्यातील स्नायूविकासानुरूप ०.२ वा अधिक असतात. कुपोषित, गंभीर-वजन-घट होत असणार्या आणि दीर्घकाळ आजारी असलेल्या लोकांत, स्नायूंचे वजन काळाबरोबरच घटत असते म्हणून, त्यांच्यात निर्जलमांस पातळ्या त्यांच्या वयाकरता अपेक्षित पातळ्यांपेक्षा कमी असू शकतात.
एकच मूत्रपिंड असणार्या व्यक्तींत सामान्य पातळ्या १.८ ते १.९ इतक्या असू शकतात. निर्जलमांस पातळ्या बालकांत २.० हून व प्रौढांत १०.० हून अधिक असल्यास गंभीर स्वरूपाचा मूत्रपिंड बिघाड सूचित होत असतो आणि रक्तातील मलनिस्सारणार्थ मलनिस्सारण-यंत्राची (डायलिसिस मशीन) आवश्यकता सूचित होत असते.
वर्धित रक्त-निर्जलमांस-पातळ्यांचे कारण काय असते?
मूत्रपिंडांचे कार्य बिघडवणारी कुठलीही स्थिती रक्त-निर्जलमांस-पातळ्या वाढवण्यास कारण ठरत असते. मूत्रपिंडांचे कार्य बिघडवणारी प्रक्रिया दीर्घकाळ चालत राहिलेली म्हणजेच बद्धमूल आहे की अलीकडीलच आहे, हे जाणून घेणे महत्त्वाचे असते.
प्रौढांतील बद्धमूल मूत्रपिंड विकारांची सर्वात सामान्य कारणे उच्च-रक्तदाब आणि मधुमेह ही असतात. काही औषधे काही वेळेस अपसामान्यपणे चढलेल्या निर्जलमांस-पातळ्या घडवतात. रक्तद्रावणातील (सिरम मधील) निर्जलमांस काही वेळेस आहारातील मांसामुळे तात्पुरते वाढते, निर्जलमांस-मापनांत काही वेळेस, सेवनातील पदार्थांची भूमिकाही असते.
रक्तातील चढलेल्या निर्जलमांस पातळ्यांशी संबंधित अशी काही लक्षणे असतात काय?
मूत्रपिंडाच्या अपुर्या कार्याशी संबंधित लक्षणे खूप बदलती असतात. काही लोकांत, काही वेळेस, गंभीर मूत्रपिंड आजार आणि चढलेल्या निर्जलमांस पातळ्या, कुठल्याही लक्षणांविना रक्तात वावरत असतात. काहींत समस्येच्या कारणानुरूप, मूत्रपिंड बिघाडाची निरनिराळी लक्षणे उपस्थित असू शकतात, ज्यांत खालील लक्षणांचा समावेश होतो.
१. निर्जल झाल्याची भावना
२. थकवा
३. सूज
४. श्वसनहीनता
५. गोंधळलेपणा किंवा
६. इतर अनेक कुठलीही वैशिष्ट्ये नसलेली लक्षणे
संदर्भः कथुरिया प्रणय आणि मेलिस्सा कोनराड स्टॉपलर, “क्रॉनिक किडनी डिसीज”, ई-मेडिसिन-हेल्थ, २३ फेब्रुवारी २०१०.
संदर्भः http://www.emedicinehealth.com/chronic_kidney_disease/article_em.htm
नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे
१.
प्रश्नः मूत्रपिंडांचे कार्य केवळ रक्त गाळून स्वच्छ करण्याचेच असते. चूक की बरोबर?
उत्तरः चूक. कमरेच्या वरच्या बाजूस, पाठीच्या कण्याच्या दोन्ही बाजूंस असलेले दोन अवयव म्हणजेच मूत्रपिंडे, आयुष्य सांभाळणार्या अनेक भूमिका बजावत असतात. टाकाऊ पदार्थ व अतिरिक्त द्रव बाहेर टाकून ते रक्तास स्वच्छ करत असतात, रक्तातील क्षार व खनिजे यांचे संतुलनही सांभाळत असतात आणि रक्तदाब नियमनाचेही काम करत असतात.
२.
प्रश्नः मूत्र हे मूत्रपिंडातच तयार होत असते. चूक की बरोबर.
उत्तरः बरोबर. मूत्रपिंडे ही बहुचर्चित पुनःप्रक्रियक-यंत्रे असतात. दररोज मूत्रपिंडे सुमारे २०० लीटर[२] रक्त गाळून सुमारे दोन लीटर टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त पाणी मूत्राद्वारे निष्कासित करत असतात, जे मूत्राशयातून मूत्रनलिकांवाटे विसर्जित केले जात असते. लघवी होण्यापूर्वी मूत्राशय मूत्र साठवत असते.
३.
प्रश्नः मूत्रपिंडांच्या कार्यार्थ कुठला शब्द ऍलोपॅथीत वापरला जात असतो?
उत्तरः रेनल फन्क्शन. मूत्रपिंडे किती कार्यक्षमतेने रक्त गाळत आहेत त्याची चर्चा करण्यासाठी हे शब्द वापरले जातात. दोन्हीही मूत्रपिंडे कार्यरत असलेल्या माणसांत मूत्रपिंडकार्य १००% होत असते.
४.
प्रश्नः बद्धमूल मूत्रपिंड आजाराची, कुठलीही वैशिष्ट्ये नसलेली सामान्य लक्षणे कोणती?
उतारः मूत्रपिंड आजारात कुठलीही वैशिष्ट्ये नसलेली सामान्य लक्षणे समाविष्ट असू शकतात. रात्रीच्या वेळी लघवी लागण्याचे वाढते प्रमाण, थोडी थोडी लघवी होणे, सूजः विशेषतः हाता-पायांवरची, डोळ्यांभोवतीचा फोफसेपणा, तोंडास वाईट चव येणे, श्वासास लघवीची घाण येणे, सततचा थकवा किंवा श्वसनहीनता, भूक मंदावणे, वाढता रक्तदाब, निस्तेज त्वचा, अति-सुकलेली खाजती त्वचा. मुलांत वाढता थकवा, झोपाळूपणा, भूक मंदावणे आणि वाढ मंदावणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
५.
प्रश्नः व्यक्तीला लक्षणविहीन बद्धमूल मूत्रपिंड विकारही असू शकतो. खरे की खोटे?
उत्तरः खरे आहे. एखाद्या व्यक्तीला ३० वर्षे वा अधिक काळापासून लक्षणविहीन बद्धमूल मूत्रपिंड विकारही असू शकतो. बद्धमूल मूत्रपिंड विकार अचानकच उद्भवला असेही वाटू शकते. मात्र अनेक वर्षांत, मूत्रपिंडांना होणार्या हानीसोबतच तो कले कलेने वाढत असतो. बद्धमूल मूत्रपिंड विकारास रोखण्याचा एक उपाय म्हणजे, साध्या रक्तचाचण्यांद्वारे निर्जलमांस पातळ्यांची नोंद करत राहणे.
६.
प्रश्नः कुठला मूत्रपिंडविकार अनुवांशिक असल्याचे मानले जाते?
उत्तरः पॉलिसिस्टिक. अनुवांशिक मूत्रपिंडविकार दोन्ही मूत्रपिंडांवर आलेल्या स्वभावात्मक अनेक गळवांनी व्यक्त होतो. सामान्य मूत्रपिंड उती निरनिराळ्या आकारांच्या, आजारासोबच वाढत जाणार्या गळवांत बदलली जात असते.
७.
प्रश्नः मूत्रपिंड निकामी होण्यावर यांत्रिक-मलनिस्सारण (हेमो-डायलिसिस) हाच एकमेव उपाय आहे. खरे की खोटे?
उत्तरः खोटे. मूत्रपिंड निकामी होण्यावर उपचार करण्याचे तीन पर्याय असतात. यांत्रिक-मलनिस्सारण, पेरिटोनिअल-डायलिसिस आणि मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण. मात्र इतर दोन्ही उपाय करण्यापूर्वी बहुधा यांत्रिक-मलनिस्सारण केले जाते.
८.
प्रश्नः मूत्रपिंड विकार तज्ञास ऍलोपॅथीत काय म्हणतात?
उत्तरः नेफ्रोलॉजिस्ट.
९.
प्रश्नः मूत्रपिंडविकाराच्या किती पायर्या असतात?
उत्तरः पाच.
प्रश्नः यांत्रिक-मलनिस्सारण करत असलेल्या रुग्णांनी कशात समृद्ध असलेला आहार घ्यावा?
उत्तरः प्रथिनांत. अशा रुग्णांना, ते खाऊ शकतील तितकी उच्च-दर्जाची प्रथिने खाण्यास उत्तेजन दिले जाते. ती मांस, मासे, कोंबड्या आणि अंडी (विशेषतः त्यातील पांढरा बलक) यांपासून मिळतात. अनेक रुग्णांकरता हा मोठाच बदल ठरू शकतो, कारण अजूनपर्यंत यांत्रिक-मलनिस्सारण आवश्यक नसलेल्या रुग्णांनी घटलेल्या प्रमाणात प्रथिने खाणे अपेक्षित असते.
११.
प्रश्नः यांत्रिक-मलनिस्सारण करत असलेल्या रुग्णांनी पोटॅशियम कमी खावे. बरोबर की चूक.
उत्तरः बरोबर. अशा रुग्णांनी जास्त पोटॅशियम खाणे हृदयाकरता अत्यंत धोकादायक ठरू शकते आणि त्यामुळे मृत्यूही ओढवू शकतो. त्यांनी पोटॅशियम अतिशय जास्त प्रमाणात असलेले अव्हाकाडो, केळी, किवी आणि सुका मेवा इत्यादी अन्नपदार्थ टाळावे.
१२.
प्रश्नः यांत्रिक-मलनिस्सारण करत असलेल्या रुग्णांनी त्यांची हरपलेली पोषकद्रव्ये, बाजारात उपलब्ध असलेल्या जीवनसत्त्वांतून मिळवू शकतात. चूक की बरोबर.
उत्तरः चूक. महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि क्षार यांना ते पारखे होत असतात, कारण त्यांना काही अन्नपदार्थ टाळावयाचे असतात.
अत्यंत महत्त्वाचेः यांत्रिक-मलनिस्सारण करत असलेल्या रुग्णांनी बाजारात सहज उपलब्ध असणारी पूरक जीवनसत्त्वे घेऊ नयेत. कारण त्यात धोकादायक ठरू शकणारी जीवनसत्त्वे अथवा क्षार असू शकतात. डॉक्टर योग्य ती जीवनसत्त्वे अथवा क्षार लिहून देऊ शकतात.
१३.
प्रश्नः मूत्रपिंडविकार झालेल्या रुग्णांना पाण्याच्या सेवनाचे व्यवस्थापन का करावे लागते?
उत्तरः मूत्रपिंडविकार झालेल्या रुग्णांना तहान आणि पाण्याचे सेवन, अगदी फळे व भाजीपाल्यांपासून मिळणारे पाणीही, नियंत्रित करावे लागते. कारण अतिरिक्त पाण्याने वजन वाढू शकते, सूज येऊ शकते आणि रक्तदाबही वाढू शकतो. म्हणून सेवनातील सोडियम खूपच घटवावे लागते. किंबहुना टाळावेच लागत असते.
१४.
प्रश्नः यांत्रिक-मलनिस्सारण करत असलेल्या रुग्णांना अतिरिक्त स्फुरद झाल्यास त्वचा खाजू शकते. खरे की खोटे?
उत्तरः खरे. अतिरिक्त स्फुरद खाजर्या त्वचेप्रत नेऊ शकते. रक्तात अतिरिक्त स्फुरद झाल्यास ते अस्थिंतील कॅल्शियम घटवते, ज्यामुळे अस्थी अशक्त होऊन अस्थिभंग होऊ शकतो.
१५.
प्रश्नः अमेरिकेतील मूत्रपिंड निकामी होण्यासाठीचे प्रमुख कारण काय असते?
उत्तरः मधुमेह. मूत्रपिंड निकामी होण्याचे सर्वात प्रमुख कारण मधुमेह हे असते. नव्या प्रकरणांतील ४४% प्रकरणांत हे कारण मधुमेह हे असते. अमेरिकन मूत्रपिंड-प्रणाली-विद्यावरून अनुक्रमे खालील कारणांनी मूत्रपिंड निकामी होत असतात.
१. मधुमेह
२. उच्च-रक्तदाब
३. ग्लॉमेरुलोनेफ्रिटिस
४. गळू-विकार
५. मूत्रविकार
६. इतर कारणे
-----------------------------------------------------
[१] युरिया किंवा कार्बामाईड हे एक सेंद्रिय संयुग असून त्याचे सूत्र CO(NH२)२ हे असते. हे पाण्यात सहजपणे विरघळते.
[२] मुळात इथे अमेरिकन क्वार्ट हे एकक वापरलेले आहे. एक अमेरिकन क्वार्ट म्हणजे ०.९४६३५३ लीटर.

श्रेय-अव्हेरः मी डॉक्टर नाही. वरील माहिती ही संदर्भित संकेतस्थळावरील उपयुक्त माहिती आहे, असे वाटल्याने, तिचा यथामती मराठी अनुवाद इथे प्रकट केलेला आहे. त्याचा केवळ सामान्य माहिती म्हणूनच वापर करावा. समाजातील वाढत्या मूत्रपिंड निकामी होण्याच्या प्रमाणामुळे, सहज उपलब्ध असाव्या अशा माहितीची मराठी साहित्यांत असलेली उणीव जाणवण्यासारखी आहे. ती भरून काढण्याचाच उद्देश ह्या अनुवाद करण्यात आहे. अनुवादातील चुका लक्षात आणून दिल्यास त्या दुरूस्त केल्या जातील.

- सामान्य व किंचित वाढलेल्या गाळपासहितची मूत्रपिंडहानी
- मूत्रपिंडकार्यात झालेली किंचित घट
- मूत्रपिंडकार्यात झालेली मध्यम प्रमाणातील घट
- गंभीर स्वरूपातील मूत्रपिंडकार्यात झालेली घट
- मूत्रपिंड निकामी होणे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा