प्रार्थना

न त्वहं कामये राज्यं न स्वर्गं नापुनर्भवं । कामये दुःखतप्तानां‌ प्राणिनां आर्तिनाशनम्‌ ॥

न राज्य चाहूँ, न स्वर्ग चाहूँ और न चाहूँ मोक्ष, मैं तो चाहूँ, दुःखियों की पीडा होवै सभी खतम ।

नको राज्य, नको स्वर्ग, नको मोक्षही मला, दुःखितांच्या नष्ट व्हाव्या, आर्ती सार्‍या आजला.

I desire neither kingdom nor heaven nor liberation. I desire end of miseries for all the life on the earth.

२००९/०९/१३

आरोग्यदान

आता रुग्णात्मके देवे । येणे उपचारे तोषावे ।।
तोषोनि तुज घ्यावे । आरोग्यदान हे ।। १।।

दिनचर्या रोज पाळावी । ऋतुचर्या अवलंबावी ।।
सद्वृत्ती नेहमी असावी । आरोग्यलाभा ।। २।।

स्वत:ची स्वच्छता ठेवा । परिसर ही स्वच्छ ठेवा ।।
शुद्ध पाणी, अन्न, हवा । आरोग्य देते ।। ३।।

रोगासी घालण्या आळा । लसीकरणाच्या वेळा पाळा ।।
सांभाळा गर्भवतीसह बाळा । वृद्धाला स्नेह द्या ।। ४।।

कुपोषणा होऊ न द्यावे । खाणे अतिशय टाळावे ।।
वेळेवरी घेत जावे । व्यायाम, अन्न, झोप ।। ५।।

जाहला जरी का रोग । वैद्याकडे जावे सवेग ।।
होऊ न द्यावा उद्वेग । शरीरमानसी ।। ६।।

वेळेवरी औषध घ्यावे । अनुपाना न विसरावे ।।
पथ्यापथ्यास पाळावे । साधाया रोगमुक्तता ।। ७।।

घ्यावे पंचकर्म आणि रसायन । रोगाचे न होईल पुनरागमन ।।
करावे कर्तव्य पालन । लाभे आरोग्य संपदा ।। ८।।

येथ म्हणे श्री रुग्णेश्वराहो । हे होईल आरोग्यदान हो ।।
येणे बरे वैद्यराजो । सुखिया झाला ।। ९।।

वैद्य एकनाथ कुलकर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: